गुरुवार, २६ मार्च, २००९

प्रत्येक नव्या सुर्योदयाबरोबर, आपली एक नवी सुरुवात




नमस्कार मित्रांनो,

हे माझे पहिले Blog Post आहे. मला माहिती आहे की हे चित्र अस्पष्ट आहे आणि तुमच्यापैकी बरेच लोक असा विचार करत असतील की मी हे चित्र का वापरले. ह्यासाठी मी पुढील कारण देइन: हे दृश्य ' हिकुरांगी ' पर्वतावरील सुर्योदयाचे आहे.

ज्या लोकांना माझे उत्तर समजले असेल, त्या सर्वांच्या सामान्य ज्ञानाची मी प्रशंसा करतो. पण तुमच्यापैकी ज्यांना हिकुरांगी पर्वताबद्दल काहीही माहिती नाही, अशांसाठी हे पुढील वर्णन :

हिकुरांगी पर्वत (किंवा टे अरा की हिकुरांगी) हे न्यूझिलैंड देशाच्या उत्तर बेटांमधील उत्तर-पूर्व बाजूचे १७५४मीटर (५७५५ फुट) ऊंच शिखर आहे. हे ठिकाण ईस्ट केपच्या ६० किलोमीटर (३७ मैल) दक्षिण-पश्चिम बाजूला आहे. हे शिखर उत्तर बेटाचे ज्वालामुखी नसलेले सर्वात ऊंच ठिकाण आहे.
आहे की नाही हे गमतीशीर? नाही, गमतीदार गोष्ट हि आहे की ह्या शिखरावर नवीन दिवसाच्या सुर्याची किरणे सर्वप्रथम पडतात. फिजी आणि टोंगा हे प्रदेश ह्या ठिकाणच्या उत्तरेला असल्यामुळे वरिल विधान पूर्णपणे खरे नाही. दक्षिण गोलार्धातील उन्हाला सोडल्यास इतर कोणत्याही वेळेस हे विधान तर नक्कीच लागू होत नाही. मात्र उन्हाळ्यात पृथ्वीच्या अंशाच्या कलनाने हिकुरांगी पर्वतावर सूर्यकिरणे ह्या प्रदेशांपेक्षा लवकर पडतात. तरीही इथे ती चाथम बेट (किंवा अंटार्कटिका) पेक्षा लवकर पोहचत नाहीत. शिवाय उन्हाळ्याच्या मध्यात सुद्धा दक्षिण बेटांवर असलेल्या काही दक्षिण-पूर्व टेकडयांवर सूर्यकिरणे काहीशी लवकर पडतात. हे सर्व जरी खरे असले तरीही नवीन वर्षाच्या स्वागतसमायी ह्या पर्वताला एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते.
न्यूझिलैंड हा देश नवीन दिवस पाहणारा जगातील सर्वप्रथम प्रदेशांपैकी एक आहे. हा देश GMT
(ग्रीनविच मिन टाइम) ह्या वेळ क्षेत्राच्या १२ तास पुढे आहे.

ह्या कारणाने मी असा विचार केला की माझी पहिली Post हि ह्या विषयावर असेल. तुम्हा सर्वांना ही पोस्ट आवडेल अशी मी आशा करतो. तुम्ही यापुढेही माझ्या Blog ला भेट द्याल याचाही मला विश्वास आहे. माझ्या कोणत्याही Post वर आपण आपले मत किंवा सूचना जरुर द्या. त्याची मला भविष्यात सुधारणा करायला नक्कीच मदत होईल.




अधिक माहितीसाठी ह्या Link वर भेट द्या :

1. http://www.doc.govt.nz/templates/PlaceProfile.aspx?id=34830

2. http://www.newzealand.com/travel/sights-activities/scenic-highlights/scenic-views/scenic-highlight-details.cfm/businessid/63608.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा