शनिवार, २८ मार्च, २००९

पृथ्वीला मत द्या




सर्व मित्रांना माझा सप्रेम नमस्कार,

आज जगभरात जो सर्वात महत्त्वाचा उपक्रम राबविला जाणार आहे, त्याविषयी मी आपल्या बरोबर काही संवाद साधू इच्छितो. हा उपक्रम म्हणजे '६० अर्थ अवर' (पृथ्वीचा तास) होय.

ह्या वर्षी, 'अर्थ अवर' (पृथ्वीचा तास) हा उपक्रम पहिल्या 'जागतिक मतदान' यामध्ये रूपांतरित झाला आहे. ही लढत पृथ्वी आणि जागतिक तापमानवाढ या दोघांमध्ये होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच सर्व वयाच्या, सर्व राष्ट्रांच्या, सर्व जातींच्या सर्व वर्गांच्या लोकांना आपल्या दिव्याच्या ळीच्या (बटणाच्या) द्वारे मतदान करायची संधी प्राप्त झाली आहे - आपला दिवा बंद करुन पृथ्वीला मत द्या किंवा त्याला चालु ठेवून जागतिक तापमान वाढीला मत द्या.

'
६० अर्थ अवर' हा कार्यक्रम WWF (वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर किंवा वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड) ह्या संस्थेने आयोजित केला आहे. डिसेंबर २००९ मध्ये जागतिक हवामानाबद्दल आयोजित केलेल्या वाटाघाटींमध्ये काही महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतले जाणार आहेत. ह्या कारणाने २००९ वर्ष आणीबाणीचे ठरणार आहे. 'अर्थ अवर' (पृथ्वीचा तास) हा उपक्रम लोकांचा आवाज आधोरेखित करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला असून, त्याद्वारे लोक नेत्यांना प्रत्यक्ष आज्ञा करतील. ह्या उपक्रमाद्वारे एखादे अर्थपूर्ण धोरण आखले जाण्याची अपेक्षा आहे.

अर्थ अवर हा उपक्रम सर्वप्रथम २००७ साली, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे हाती घेण्यात आला. त्यावेळे घर उद्योग मिळून २२ लाख ठिकाणी एक तासासाठी दिवे बंद ठेवण्यात आले. २००८ साली हा संदेश एक जागतिक ळी परावर्तित झाला, ज्याद्वारे कोटी लोकांनी आपले दिवे बंद ठेवले. आता २००९ मध्ये भारत प्रथमच अर्थ अवर ह्या ळी सहभागी होत आहे. दिल्ली मुंबई ही शहरे जगभरातील ८० देशांमधील ८२५ शहरांमध्ये आहेत, ज्यांनी अर्थ अवर दरम्यान 'पृथ्वीला मत' देण्याची शपथ घेतली आहे. हा आकडा दर दिवसाबरोबर वाढतच आहे. पुण्यातुनदेखिल माझे बरेच मित्र ह्या उपक्रमात सक्रीयपणे सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान हा भारतात ह्या उपक्रमाला प्रसिद्धी देणार आहे. HP, HSBC आणि Wipro यांसारख्या भरपूर औद्योगिक संस्थादेखिल ह्यात सहभागी होणार आहेत.

२००९ साली 'अर्थ अवर' ह्याला एका नवीन उंचीवर नेण्यात येणार आहे, ज्यात १०० कोटी लोक सहभागी होऊन एका जागतिक मताचा भाग म्हणुन आपले दिवे बंद ठेवतील अशी अपेक्षा आहे. तिहासातील इतर कोणत्याही मतदानासारखे तुम्ही कोणत्या देशाचे आहात हे महत्त्वाचे नसून ह्या वेळेस तुम्ही कोणत्या ग्रहावरचे आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. वोट अर्थ (पृथ्वीला मत) हा एक जागतिक आवाज असून तो प्रत्येक माणूस, उद्योग आणि समाजासाठी आहे. उभे राहून आपल्या भविष्यावर नियंत्रण मिविण्यासाठी सर्वांना दिलेला एक आवाज.

आपल्या प्रत्येकाकडे एक मत आहे आणि प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. पुढील पिढीसाठी आपण प्रत्येकजण एकत्र येऊन आपल्या ग्रहाचे नियंत्रण मिवू शकतो.

VOTE EARTH

२८ मार्च रोजी, शनिवारी, रात्री .३० ते .३० या आपल्या स्थानिक वेळेत फक्त एक तासाकरीता आपले दिवे बंद ठेऊन आपण पृथ्वीला मत देऊ शकता.

ह्या गंभीर विषयामध्ये आपली उत्सुकता दाखविण्यासाठी आपले आभार. मी अशी आशा करतो की आपण सर्वजण मिळून आपली ही सुंदर पृथ्वी पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेऊ.

मी आपणा सर्वांना अशी विंनती करतो की आपण कृपया पुढील Link वर भेट द्यावी, ज्यावर आपल्याला अधिक माहिती आणि प्रत्येक दिवशी इंधन बचत कशी करावी याबद्दलचे काही उपाय देण्यात आले आहेत :

1. http://www.earthhour.org/

2. http://earthhour.in/

3. http://en.wikipedia.org/wiki/Earth_Hour

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा