शुक्रवार, २७ मार्च, २००९

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !!!!




नमस्कार मित्रांनो,

आज मी तुम्हाला गुढी पाडवा ह्या सणाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. हा सण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

गुढी पाडवा हा पहिला धार्मिक सण आहे ज्याने हिंदूंच्या नवीन वर्ष, नवीन महिना आणि नवीन दिवसाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू चांद्र-संवत्सरानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेला येतो. हा सण वसंत ऋतूची सुरुवात म्हणून मानला जातो. ग्रेगोरियन कालनिर्णयानुसार हा दिवस मार्च महिन्याचा शेवट व एप्रिल महिन्याची सुरुवात यांमधल्या काळात येतो. हा हिंदू चांद्र-संवत्सरानुसार साडे-तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, ज्याचा प्रत्येक क्षण हा नवीन कार्यासाठी शुभ मानला जातो.

ह्याच दिवशी ब्रह्मदेवानी ब्रम्हांडाची रचना केली. ह्या कारणाने हिंदूंसाठी हा दिवस खास महत्त्वाचा असतो. ह्या दिवशी सर्वप्रथम अभ्यंगस्नान करतात, दरवाज्याला तोरण बांधून सजवतात, पूजा-अर्चना करुन मग गुढी उभारतात. गुढी विजयाचे निशाण आहे. देवाच्या विविध गुणधर्मांपैकी 'विजय प्राप्त केलेला' हा एक गुण आहे आणि त्याने अनेक ठिकाणी प्राप्त केलेल्या विजयांचे हा गुण प्रतिक आहे. हे दर्शविण्यासाठी गुढी उभारली जाते. गुढी घराच्या मुख्य दरवाज्यावर उभारतात. ह्यासाठी निवडलेली जागा ही उजव्या बाजूस (घरातून बघितले असता) असावी. उजवी बाजू आत्म्याच्या उत्साही स्थितीची दर्शक आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी अग्नि (तेज) तत्व व प्रजापति (नवनिर्माण) तत्व या दोहोंनी भरलेल्या लहरी मोठया प्रमाणात सक्रिय होतात. जर ह्या दैवी चेतनेला सुर्योदयासमायी आत्मसात केले, तर ती जास्त काळासाठी टिकते. ही चेतना शरीरातील पेशींमध्ये साठविली जाते आणि जशी गरज पडेल तशी ती वापरली जाते. वरील कारणाने असे मानले जाते की सूर्योदयानंतर ५ - १० मिनिटांमध्ये गुढीची पूजा-अर्चना करावी.

प्रसाद म्हणून कडूलिंबाची पाने गु
ळाबरोबर दिली जातात. ह्या सणासाठी खास जेवण तयार केले जाते, उदा., श्रीखंड-पुरी किंवा पुरणपोळी इ.

तर मित्रांनो, माझ्याकडून तुम्हा सर्वांना
"गुढी पाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा"


अधिक माहिती पुढील Link
वर भेट द्या:

1. http://en.wikipedia.org/wiki/Gudi_Padwa

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा